शशिकांत हुमणे - लेख सूची

गणेशजन्मात विज्ञानाची प्रतिष्ठापना

लोकसत्तेच्या दि. १५-९-२००२ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. अभय दि. कानेटकरांचा “गणेशजन्मात विज्ञानाची प्रतिष्ठापना” हा लेख मुखपृष्ठावर व अंतिम पृष्ठावर ठळकपणे छापण्यात आला आहे. सश्रद्ध, भाविक तथा देवभोळ्या भक्तसमुदा-यांसाठी या लेखाचे प्रयोजन असावे. अन्यथा विवेक जागृत असलेल्या व विज्ञानाची तोंडओळख असलेल्या कोणत्याही इसमास डॉ. कानेटकरांची विधाने (त्यांच्या समुदायास मान्य असलेल्या सांस्कृतिक परंपरेला आदर्श मानणाऱ्या इसमांना सोडून) …

शिक्षणाचे मूलभूत अधिकार हिरावून घेणारी घटनादुरुस्ती मागे घ्या

मूळ भारतीय जनतेने इतरांवर अवलंबून न राहता भारत देशाचा कार्यभार स्वतः चालवावा याकरिता लागणारे शिक्षण स्वखर्चाने घेऊ शकणार नाही व विशिष्ट स्वार्थी मंडळी शिक्षण घेऊ देणार नाही याची जाण ठेवून सर्वांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी संविधानाच्या भाग ४ मधील अनुच्छेद ४५ अन्वये राज्य सरकारवर सोपविली. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४५ मध्ये अशी तरतूद केलेली …

‘खादी आणि रोजगार’ या लेखाच्या निमित्ताने

नोव्हेम्बर २००१ च्या १२/८ या अंकात श्री. मोहनी यांनी ‘खादी आणि रोजगार’ या विषयावर रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने व्यावहारिक तशीच तात्त्विक चर्चा केली. रोजगार-निर्मितीमागील प्रेरणा, उपभोग्य वस्तूंचे उत्पादन, उत्पादन-प्रक्रियेत होणारे बदल वगैरेचा धावता आढावा घेऊन काही उपयुक्त प्रमेये मांडली. जसे “उपभोग्य वस्तूंचे प्रमाण सतत वाढवीत नेल्याशिवाय रोजगार वाढत नाही.” “संपन्नता श्रमाचे परिमाण वाढवून कधीच येत नाही …